‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी। मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे सोमवारी विदर्भात प्रचाराला येत आहेत. सोमवारी, सकाळी ७.३० वाजता ते खासगी विमानाने नागपूर विमानतळावर येतील. विमानतळावर मनसे कार्यकर्त्यांकडून स्वागताचा स्वीकार करून ते वणी येथे रवाना होतील.

सकाळी १० वाजता वणी येथे मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारसभेला ते संबोधित करतील. त्यानंतर वरोरा येथे पक्षाचे उमेदवार रमेश राजूरकर यांच्या प्रचारसभेत हजेरी लावल्यानंतर नागपुरात परततील. त्यानंतर खासगी विमानाने पुणे येथे होणाऱ्या जाहीर सभेकरिता ते रवाना होतील. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी हजर राहावे, असे आवाहन पक्षाचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी केले आहे.

दरम्यान मुंबई मध्ये प्रचाराचा धडाका सुरु केल्यानंतर राज यांनी आपला मोर्चा विदर्भाकडे वळवला आहे. ”हीच ती वेळ म्हणता तर गेली पाच वर्षे काय करत होता? हीच ती वेळ म्हणण्याचा अधिकार मला आहे. कारण सरकार तो अधिकार गमावून बसले आहे. नोकऱ्या मिळतील, बँकांची कामं सुरळीत होतील, पण त्यासाठी सरकारवर अंकुश हवा. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मत द्या,” असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे विदर्भात देखील सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न राज यांचा असणार आहे.

इतर काही बातम्या-

 

Leave a Comment