संजय राऊत यांनी राहुल गांधींना उत्तर देण्याचं जे धाडस दाखवलं त्याच कौतुकच आहे..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । शिवसेना खासदार संजय राऊतांकडून सावरकरांना भारतरत्न देण्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे. शिवाय, सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध कऱणाऱ्यांना अंदमानमध्ये सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या ठिकाणी दोन दिवस पाठवायला हवं, असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे. या वक्तव्यावर आता सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

”संजय राऊत यांच्या वक्तव्याचं मी स्वागत करतो कारण हे वक्तव्य म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलेला सल्लाच आहे असं सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचा वीर सावरकरांना विरोध असतानाही संजय राऊत यांनी हा सल्ला देण्याचं धाडस दाखवलं त्याचं मी कौतुक करतो असंही रणजीत सावरकर म्हणाले आहेत.” एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेची भूमिका सावरकरांना पाठिंबा देणारी आहेच. आता येत्या काळात शिवसेना काँग्रेसचीही समजूत घालेल आणि त्यांना सांगेल की तुमचा सावरकर विरोध हा फुकाचा आहे तो बाजूला ठेवा असा विश्वासही रणजीत सावरकर यांनी व्यक्त केला. दरम्यान, दरम्यान संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं त्याचा पक्षाशी काही संबंध नाही असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच किती दिवस आपण इतिहासावरच बोलायचं? असा उपरोधिक टोलाही राऊत यांना लगावत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 

इंदिरा गांधी यांच्या वक्तव्यावरून आधीच काँग्रेस नेते संजय राऊत यांच्यावर भडकले असताना राऊत यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी पुढं करत शिवसेनेच्या अडचणीत भर घातला आहे. शिवसेना काँग्रेससोबत राज्यात सरकार चालवत असताना काँग्रेसचा सावरकांना भारतरत्न देण्याबाबत विरोध पाहता राऊत यांचे वक्तव्य शिवसेनेला अडचणीत आणणारे सध्यातरी दिसत आहे. दरम्यान आदित्य ठाकरे राऊत यांच्या वक्तव्यावर त्याच वैयक्तिक मत असल्याच सांगत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

 

Leave a Comment