राज्यपालांचे पत्र पाहून शरद पवार संतापले; थेट पंतप्रधान मोदींकडे केली तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लेटरवॉर भडकलं असताना महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेतला आहे.

राज्यपाल कोश्यारी यांचं वागणं संविधानाची चौकट मोडणारं असल्याचं परखड मत व्यक्त करतानाच धार्मिक स्थळे उघडली नाहीत म्हणून ‘सेक्युलर’ ठरवून अवहेलना करणार का? असा सवालच शरद पवार यांनी या पत्रात विचारला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात ज्या भाषेचा प्रयोग केला आहे तो धक्कादायक आहे. राज्यपालांना अशी भाषा शोभत नाही, अशी तक्रारच शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

Leave a Comment