कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. अनेक राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार यांनाही करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आता कोल्हापूर दक्षिणचे काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांना करोनाची लागण झाली आहे.

ऋतुराज यांनी स्वत: याबद्दल ट्वीट केलं आहे. ‘माझी कोरोना चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करू नये,’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी,’ असं आवाहनही त्यांनी केलं आहे.कोल्हापुरातील सर्वात तरुण आमदार असलेले ऋतुराज पाटील हे तरुण वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. जिल्ह्यात ते वेगवेगळे उपक्रम राबवत असतात.

ऋतुराज पाटील हे करोनाच्या काळात सातत्यानं कोविड योद्धे म्हणून काम पाहत होते. जनजागृती करण्याबरोबरच पक्ष व सरकारी पातळीवर अनेक बैठकांना त्यांची उपस्थिती होती. या कामाच्या दरम्यान आलेल्या संपर्कातून त्यांना लागण झाली असावी, अशी शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment