आपापल्या नेत्यांना, आईला वंदन करत पार पडला महाविकासआघाडीचा शपथविधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्रातील नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी गुरुवारी संध्याकाळी शिवाजी पार्क येथे दिमाखात पार पडला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मिळून घेतला. यावेळी प्रत्येक नेत्याने घेतलेली शपथ ही चांगलीच लक्षात राहणारी होती.

उद्धव ठाकरे यांनी ईश्वराला आणि आपल्या आई-वडिलांना स्मरून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना स्मरून आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादीतर्फे शपथ घेताना जयंत पाटील यांनी आपल्या नावामध्ये आईचं नाव लावण्यासोबतच शरद पवारांच्या आशीर्वादाचा उल्लेख केला. छगन भुजबळ यांनी शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांसोबतच शरद पवार यांचा उल्लेख करत आपल्या पदाची शपथ घेतली.

काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधी यांचं नाव घेत आपली शपथ पूर्ण केली. तर डॉ नितीन राऊत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध आणि स्वतःच्या आईला सन्मान देत आपली शपथ पूर्ण केली. प्रत्येकजण आपापली ओळख वेगळ्या पद्धतीने करुन देत असताना उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मितहास्यही यावेळी पहायला मिळत होतं.

Leave a Comment