बॉक्स ऑफिसवर तिरंगी लढत, तुमची पंसती कोणाला? छपाक,दरबार की तान्हाजी

टीम हॅलो महाराष्ट्र। नववर्षाच्या सुरुवातीलाच तीन तगडे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ‘छपाक’, अभिनेता अजय देवगणचा ‘तान्हाजी’ आणि  रजनीकांतचा ‘दरबार’अशा दमदार स्टार्सचे हे तीन सिनेमे प्रदर्शित होत आहेत. त्यामुळं बॉक्स ऑफिसवर या तीन सिनेमांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. पहिल्यांदाच वर्षाच्या सुरुवातीलाच कुठलाही मोठा वीकेंड नसताना महत्त्वाच्या सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर होत असल्यामुळे, प्रेक्षक कोणत्या सिनेमाला पसंती देणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

मेघना गुलजार दिग्दर्शित आणि दीपिकाची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छपाक’ सिनेमा असिड अटॅकग्रस्त लक्ष्मीच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमातून संवेदनशील विषय हाताळण्यात आला आहे. दीपिकाचा सिनेमातील लूकही सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. त्यामुळे या सिनेमाकडून सगळ्यांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत.

ओम राऊत दिग्दर्शित आणि अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या तान्हाजी द अनसंग वॉरिअर या सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तान्हाजी मालुसरेंची ही शौर्यगाथा थ्रीडी मध्ये मोठ्या पडद्यावर रसिकांना बघायला मिळणार आहे. हा सिनेमा खऱ्या अर्थाने रसिकांसाठी व्हिज्युअली ट्रीट आहे. अजय देवगण, काजोल, सैफअली खान, शरद केळकर अशी तगडी स्टारकास्ट असल्यामुळे रसिकांनाही सिनेमाकडून प्रचंड अपेक्षा आहेत.

या दोन सिनेमांना टक्कर देण्यासाठी थलैवानेही दरबार सिनेमाच्या निमित्तानं बाह्या सरसावल्या आहेत. विशेष म्हणजे ए.आर. मुरगुदास यांनी ऍक्शन थ्रिलर सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे ही जोडी बॉक्स ऑफिसवर काय कमाल करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. खऱ्या अर्थाने हा वीकेंड बॉलिवूडसाठी मोठा आहे. त्यामुळे आता या बिग फाईटमध्ये कोणता सिनेमा बाजी मारतो हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com