ATKT च्या विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारकडून दिलासा! सरासरी गुणांसह सर्वांना पास करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्यात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत सरकारचा सावळा गोंधळ सुरु अाहे. केंद्रीय गृहखात्याने विद्यापीठ परिक्षांना परवानगी दिल्यानंतर युजीसीने अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याबाबत राज्य सरकारला अधिसुचना पाठवली होती. मात्र परिक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना सरासरी गुणांद्वारे पास करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे ATKT च्या विद्यार्थ्यांना लाॅटरी लागली आहे.

राज्यातील विद्यापीठांच्या परिक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम असून ATKT च्या विद्यार्थ्यांनाही सरासरी गुण काढून पास करण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच जर एखादा विद्यार्थी सरासरी गुणांद्वारेही पास होत नसेल तर त्याला विद्यापीठाकडून ग्रेस मार्क्स देऊन पास करण्यात येणार आहे असंही सामंत यांनी सांगितले आहे.

दरम्यान, युजीसीने परिक्षा घ्याव्यात असे म्हटले असताना राज्यातील कुलगुरु आणि राज्य सरकार परिक्षा न घेण्यावर ठाम आहे. यामुळे राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून या निर्णयावर शिक्कामोर्तब होतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. युजीसीच्या गाईडलाइन विद्यापीठांना बंधनकारक आहेत. त्यामुळे आता विद्यापीठंही काय निर्णय घेतात हे पहावं लागेल.

Leave a Comment