माण-खटाव येथील उध्दव ठाकरेंची आजची सभा अचानक रद्द!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोंदवले प्रतिनिधी ।  विधानसभेच्या निवडणूकी निमित्त शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारार्थ आज सकाळी दहिवडी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार होती. परंतू खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण मुंबईतून न होवू शकल्याने ते दहिवडी येथे पोहोचू न शकल्याने त्यांची आज होणारी सभा रद्द झाली.

आज सकाळी १० वाजता दहिवडी, ता. माण येथील इंगळे मैदानावर शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार होती. दरम्यान, आज सकाळी उद्धव ठाकरे मुंबई येथून हेलिकॉप्टरद्वारे दहिवडीकडे प्रयाण करणार होते. मात्र, मुंबई येथील खराब हवामानामुळे उद्धव यांच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण होवू शकले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे निर्धारित वेळेत सभेसाठी दहिवडीत पोहोचू शकत नाही म्हणून त्यांनी शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या भ्रमणध्वनीवरुन सभेसाठी जमलेल्या जनसमुदायाशी संवाद साधला.

या सभेस उपस्थित असलेल्या लोकांना स्वतः उध्दव ठाकरे यांनी फोन वरून मार्गदर्शन करत नाराज होऊ नका मी उद्या सकाळी १० वाजता आपल्या भेटीला नक्की येणार असून माझ्या न येण्यान कोणी ही वेगळा अर्थ काढू नका उध्दव ठाकरे कधी कोणाबरोबर सेटिंग करत नाही आपले अधिकृत उमेदवा शेखर गोरे हेच असून यांना आपण आमदार करायचं आहे अस सांगितले अस जनसमुदायाला संबोधित करीत सभेला न येण्याची अडचण सांगितली. परंतू माण-खटावच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी मी उद्या येत आहे, असे वचन त्यांनी माणवासियांना दिले. दरम्यान, शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांनीही उद्याच्या सभेसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही माण-खटावच्या मतदारांना केले.

Leave a Comment