आम्हीही आता दोनाचे तीन होतोय, विराट-अनुष्काच्या घरी जानेवारीत नव्या पाहुण्याचं आगमन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी आज एक गुड न्यूज तमाम देशवासीयांना दिली आहे. दोघेही लवकरच आई-बाबा बनणार असून आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत त्यांनी ही गुड न्यूज दिली आहे.

विराट आणि अनुष्का यांचा २०१७ साली प्रेमविवाह झाला आहे. दोघेही आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असून मनोरंजन आणि क्रीडाक्षेत्रासाठी त्यांनी दिलेलं योगदानही मोलाचं आहे. हार्दिकच्या गुड न्यूजनंतर विराटलाही त्याच्या गुड न्यूजविषयी विचारणा होत होती. अखेर आज विराटने त्यावरील चुप्पी तोडत देशवासीयांना आपण बाबा होणार असल्याचा सुखद धक्का दिला आहे.

यंदाच्या लॉकडाऊनमध्ये अनेक भारतीयांनी अशा गुड न्यूज दिल्या आहेत. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला. हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोविक यांनाही मागील महिन्यात पुत्रप्राप्ती झाली आहे. एकूणच भारतीय क्रिकेट खेळाडूंचे यावर्षी अच्छे दिन आहेत.

View this post on Instagram

And then, we were three! Arriving Jan 2021 ❤️🙏

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com