कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा…?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंगोली प्रतिनिधी । प्रचंड वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या बाबींचं विश्लेषण करत असताना खा. अमोल कोल्हे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षा भंग केलेल्या फडणवीस सरकारला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असा खोचक प्रश्न विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून काढल्या गेलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा इथं आयोजित सभेत ते बोलत होते.

सतत ५ वर्षापासूनच्या दुष्काळी परिस्थिती मुळे हैराण झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा येथील शेतकरी ग्रामस्थांनी चक्क गावाच विक्रीला काढीत पीक विम्याचा पर्तावा, कर्जमाफी आदी मागण्यासाठी ७ दिवस आंदोलन केल तेव्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्याशिवाय एखादा पालकमंत्री अथवा कोणताच नेता फिरकला नाही. महाराष्ट्रातील एक गाव विक्रीला काढला जातोय आणि अशावेळी मुख्यमंत्री महाजनआदेश यात्रा काडीत फिरतात शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत या सरकारला काहीही देणघेण नसल्याच कोल्हे यांनी म्हटल आहे.

सरकारने सांगितलं होत की दरवर्षी २ कोटी रोजगार निर्माण करण्यात येतील ते तर निर्माण झालेच नाही. पण २०१८ व १९ या २ वर्षात देशातील १ कोटी १० लाख रोजगार कमी झाले आहे. असं अमोल कोल्हे म्हणाले. गेल्या ४५ वर्षात नव्हती ती बेजरोजगारी या ५ तयार झाली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी भाजप सरकारवर केला. अर्धवट कर्ज माफी, पीक विम्याच्या नावाखाली विमा कंपणीकडून होत असलेली करोडो रुपयांची लुट, वाढलेली महागाई, शेतकरी आत्महत्या आदी बाबीवरून त्यांनी भाजप सरकारवर ताशेरे ओढले.

लोकसभा निवडणूकीत आपण देशासाठी मोदींना निवडल असलं तरी आगामी विधानसभा निवणुकीत जाहीरात बाजीला बळी न पडता अपेक्षा भंग केलेल्या सरकारला कुठे नेवुन ठेवला महाराष्ट्र माझा असा जाब विचारा असा सल्ला खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी नागरिकांना दिला आहे.

Leave a Comment