तंबाखू चोळत व्यक्ती सांगतो भारत आणि इंग्रजांचा इतिहास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र | अनेकजण विनोद म्हणून तंबाखू खाणाऱ्यांची नक्कल करतात.पण अशा नकलेतून इतिहास सांगण्याची किमया एका व्यक्तीने केल्याचा व्हिडीओ वायरल होत आहे. तंबाखू खाण्याची नक्कल करत भारत, इंग्लंड आणि पाकिस्तानचा इतिहास एका व्यक्तीने विनोदी ढंगाने उलगडला. या व्यक्तीच्या नकलेतून एक चांगला विनोद तर निर्माण झालाच पण यामुळे याला विनोद म्हणून घेणाऱ्या उपस्थित नागरिकांना या तंबाखूच्या चोळण्याच्या नकलेच्या माध्यमातून इंग्रज कालीन भारताचा इतिहास कळाला.

इंग्रज भारतात कसे आले? ते राज्य कसे करत होते? त्यांना भारतातून कसे बाहेर काढण्यात आले. अशी सर्व माहिती व्हिडिओतील व्यक्तीने विनोदी ढंगाने वर्णन केली आहे. हा व्हिडीओ सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर खूपच व्हायरल होताना दिसत आहे. मात्र हा व्यक्ती कोण आहे आणि हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबद्दल माहिती मिळू शकली नाही.

 

Leave a Comment