दापोलीतही राष्ट्रवादीला खिंडार ; तीनशेहून अधिक कार्यकर्ते सेनेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी प्रतिनिधी | दापोली हा रत्नागिरी जिल्ह्याचा उत्तरेकडील मतदारसंघ. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली आणि खेड या तीन तालुक्याचा या मतदारसंघात समावेश होतो. मतदारसंघ फेररचनेत खेड मतदारसंघ दापोलीत समाविष्ट झाल्याने रामदास कदम विस्थापित झाले होते, कारण गुहागर आणि दापोली दोन्ही मतदारसंघ शिवसेनेच्या हातून निसटले होते. परंतु आता शिवसेनेने पुन्हा दापोलीसाठी कंबर कसली आहे.

कारण दापोली विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीला खिंडार पडले असून दापोली तालुक्यातील पालगड आणि कांगोयी या गावातील तीनशे हुन अधिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि युवासेना नेते योगेश कदम, सिद्धेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम हे निवडणूक लढणार असल्याने हा असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश महत्वाचा ठरला आहे.

२००९ सालच्या विधान सभा निकवडणुकीच्या वेळी मतदार संघातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच घड्याळ हातात बांधले होते. त्यामुळे रामदास कदमांना तिथे मोठा फटका सहन काराव लागला होता. परंतु आता महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती दापोली मतदार संघात पाहायला मिळत आहे. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठी देत सत्तेच्या गाडीत बसण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत. पण या प्रयत्नाने कदमांना मात्र मोठी ताकद मिळणार असल्याचीव परिस्थिती आहे.

Leave a Comment