मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांच्या वाहनांची वर्दळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायगड प्रतिनिधी | गणेशोउत्सव २ दिवसावर येऊन ठेपला असल्यान मुंबईतून चाकरमानी आपल्या गावी कोकणात तळकोकणात जाण्यासाठी निघाले आहेत. मात्र मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती फारशी चांगली नसल्यानं चाकरमान्यांना प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन महामार्गावर सज्ज झाल आहे.

मुंबई गोवा महार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. काही चाकरमानी आपल्या कुटुंबासह स्वतःच्या वाहनान गावी जातात तर काही परिवहन मंडळाच्या बसन प्रवास करताना आपल्याला दिसत आहेत. मात्र वाहतूक कोंडी टाळावी म्हणून महामार्गावरील अवजड वाहन सुद्दा बंद केली आहेत. तर वाहतूक कोंडी होणाऱ्या जागा आहे तिथे बॅरिगेट्स दुभाजक लावून वाहतून सुरळीत ठेवण्याचा पर्यंत महामार्गपोलीस विभागातून करण्यात येत आहे. पुढील काही दिवस वाहतूक सुरळीत त ठेवणे महामार्ग पोलिसांसाठी हा कसोटीचा काळ असणार आहे.

गणपती उत्सव लक्षात घेता एसटी महामंडळानेही कोकणातील विविध भागात जाण्यासाठी जादा एसटी गाड्या सोडल्यात. गणेशभक्तांचा हा प्रवास वाहतुकीच्या कोंडीशिवाय सुखकर आणि सुरक्षीत होण्याच्या दृष्टीन या काळात मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी करण्यात आली. मात्र ही निर्बंधबंदी दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्विड मेडीकल ऑक्सिजन आणि भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू नसणार आहे.

Leave a Comment