शरद पवारांच्या चिडण्यावर मुख्यमंत्री म्हणाले तरी काय ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. राष्ट्रवादी पक्षाचे दिग्गज नेते आपल्या वारसांसह भाजपा आणि शिवसेनेत सामील होत आहेत. याच संदर्भात काही दिवसा आधी अहमदनगर येथील श्रीरामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याना पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने शरद पवारांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी शरद पवार या पत्रकारावर चिडले होते.

पवारांच्या अशाप्रकारे चिडण्यावर आज मुख्यमंत्र्यानी आपली प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांच्या अचानक चिडण्याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना विचारलं असता ,त्यांनी पवार यांच्यावर टीका करणे टाळले. ” शरद पवार हे मोठे नेते आहेत त्यांच्यावर कमेंट करणे योग्य नाही . पण त्यांनी काळाची पावलं ओळखावी.” असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी पवार यांना दिला. राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्र पुरता ,त्यातही पश्चिम महाराष्ट्र पुरता मर्यादित आहे. त्यातही काही जिल्ह्यापुरता मर्यादित आहे .. राष्ट्रवादीत भविष्य नाही हे जाणून काही लोक आमच्या कडे येत आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Comment