मोठी बातमी, अटलबिहारी वाजपेयीं यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे अखेर दुर्धर आजाराने एम्स रुग्णालयात निधन झाले. वाजपेयी यांची प्रकृती मागील ४० तासांपासून चिंताजनक होती. त्यांच्यावर गेल्या ९ आठवड्यांपासून एम्स मधे उपचार सुरु होते. नुकताच एम्स रुग्णालयाचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला त्यानुसार वाजपेयी यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले.

इतर महत्वाचे –

अटलबिहारी वाजपेयींच्या या दहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय?

अटल बिहारी वाचपेयींच्या नावावरील हे राजकीय रेकॉर्ड कोणीच मोडू शकले नाही

अटलबिहारी वाजपेयी डिमेंशिया या आजाराने त्रस्त होते. या आजारात वाढत्या वयामुळे स्मृतीभ्रंश होऊन प्रकृतीत बिघाड होतो.तसेच त्यांची एकच किडनी काम करत होती त्यामुळे त्यांच्या मूत्राशयाला इन्फेक्सशन झाले होते. वाजपेयी मागील ३ दिवस वेंटिलेटरवर होते. मात्र गुरुवारी त्यांची प्रकृती अचानक ढासळली.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देशावर दुःखाचे सावट पसरले आहे. भाजपाचे देशातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी,फारूक अब्दुल्ला त्याचबरोबर अनेक केंद्रीय मंत्री आदींनी वाजपेयींची भेट घेतली आहे.

Leave a Comment