अजित पवारांना पराभूत करण्याचा भाजपचा डाव ; भाजपच्या या नेत्याने घेतली महत्वाची बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी| १९६७ ते आज तागायत बारामती मतदारसंघात एकाच कुटुंबातील व्यक्ती आमदार राहिला आहे. शरद पवार यांच्या नंतर त्यांचे पुतणे अजित पवार सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचा पराभव करणे शक्य नाही असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलच एकदा म्हणाले होते. मात्र भाजप पडद्या आडून अजित पवार यांना आगामी विधानसभा निवडणुकीला पराभूत करण्याचा डाव आखत आहे.

शरद पवार यांच्या संघटन कौशल्यात तयार झालेला हा मतदारसंघ असून या मतदारसंघात अजित पवार यांना मानणारा वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. एकीकडे आम्ही अजित पवार यांचा पराभव करण्यासाठी टपलो नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे अजित पवार यांना पराभूत करण्याची रणनीती आखत राहायच. यातून भाजपची कडवी मुसद्दी वृत्ती दिसून येते. त्यामुळे अजित पवार यांच्या विरोधात भाजप कोणाला उमेदवारी देणार हे निश्चित नसले तरी बारामती विधानसभा निवडणूक राज्याच्या पटलावर गाजणार हे मात्र निश्चित.

भाजपचें नेते आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार यांच्या विरोधात उमेदवार कोण द्यायचा आणि कोणत्या प्रकारे लढत द्यायची याची रणनीती आखण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांनी आयोजित केलेल्या बैठकीला बारामती मधील स्थानिक नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही प्रतिनिधी उपस्थित होते. भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने अजित पवार यांचा पराभव घडवून आणण्याच्या इराद्यात आहे. हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे अजित पवार यांचा पराभव घडवून आणण्यासाठी त्यांची रणनीती नेमकी काय असेल हे बघण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment