महाराष्ट्रातील ‘हे’ प्रसिद्ध गणपती मंदिर बॉम्बने उडवून देण्याची दहशतवाद्यांची धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी  | पुणे शहराला दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याने हाय अलर्ट देण्यात आला आहे. अशा अवस्थेत मुंबई येथील दादर प्रभादेवी स्थित सिद्धीविनायक मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ठाणे येथील विवियाना मॉलमधील बाथरूममध्ये धमकीचा संदेश लिखित स्वरूपात आढळलेल्याने मुंबई सह मुंबई उपनगरात एकच खळबळ माजली आहे.

.’दुश्मन पर फतेह’, JIHAD-UL-AKBAR-TAEGET DADAR SHIDHI VINAYAYAK “BOOM”’, असा संदेश त्या बाथरूममध्ये लिहण्यात आला आहे. या प्रकरणी ठाणे पोलीस अधिक तपास करत आहेत. तर या प्रकरणात ठाणे पोलिसांनी काही संशियीतांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक ठाकुर्लीचा असल्याचे पोलिसांनी संगीतले आहे.

दरम्यान पुण्यात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याने पुण्यात १९ जुलै पर्यंत हाय अलर्ट देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत दहशतवादाचा प्रकार मुंबईत समोर आल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ माजण्याची शक्यता आहे. तसेच सुरक्षा व्यवस्थे समोर देखील मोठे आव्हान उभा राहण्याची शक्यता आहे.

Leave a Comment