Breaking|पुणे जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत हर्षवर्धन पाटलांची कन्या विजयी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्य्या जागी हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील विजयी झाल्या आहेत. त्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार होत्या. अंकिता पाटील यांना १७ हजार ३०० मतांचे मताधिक्य मिळाले असून हे मताधिक्य विक्रमी मताधिक्य म्हणून गणले जाते.

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेत!

परदेशात उच्च शिक्षण घेतलेल्या अंकिता पाटील या बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटात निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाल्या तेव्हा सर्व माध्यमांच्या नजर त्यांच्यावर पडल्या. परदेशात उच्च शिक्षण घेतलेल्या अंकिता पाटील यांनी घरोघर जाऊन थोर मोठ्यांचा मनात जागा बनवली. त्याचीच परिणीती म्हणून त्या एवढ्या मोठ्या मताधिक्याने जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या आहेत.

ब्रेकिंग | सुजय विखे ,सदाशिव लोखंडेंची खासदारकी जाणार!
२०१७ साली जेव्हा जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हा अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर जहरी टीका केली होती. एवढ्या उतार वयात आईला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवणे योग्य नाही असे अजित पवार तेव्हा म्हणाले होते. मात्र यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने अंकिता पाटील यांना पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे देखील या निवडणुकीत अंकिता पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाले असावे.

Leave a Comment