भाजपचा महाप्रवेश सोहळा संपन्न ; शिवेंद्रराजेंसह इतर आमदारांचा भाजप प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | बहुप्रतीक्षित असणारा भाजपचा महाप्रवेश सोहळा संपन्न झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा मुंबईमधील गरवारे क्लबच्या हॉल मध्ये संपन्न झाला. यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांच्या सोबत अन्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी पक्ष प्रवेश केला आहे.

 

 

राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, काँग्रेसचे कालीदास कोळंबकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला. शिवेंद्रराजे पक्ष सोडणार नाहीत असा विश्वास व्यक्त करणाऱ्या शरद पवार यांना शिवेंद्रराजेंनी चांगलाच धक्का दिला आहे.

त्याच प्रमाणे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या आणि दीर्घकाळ मंत्री राहिलेल्या मधुकर पिचड यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आमदार वैभव पिचड यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ज्यांचे राष्ट्रवादी सोडणे सर्वांनाच धक्कादायक वाटले त्या चित्रा वाघ यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Leave a Comment