घोर टीकेनंतर फडणवीसांचे तुगलकी सरकार नरमले ; पूरग्रस्तांना देणारा रोखीने मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | राज्यातील पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अपयशी ठरले असताना त्यांनी बँक खात्यावर पूरग्रस्तांना मदत जमा करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या विरोधात सर्वच स्तरातून टीका झाल्या नंतर आता फडणवीस सरकारने मदत रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सरकार ५ हजार रुपयांची रोख स्वरूपात मदत पुरवणार असून उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आज ९ वा दिवस आहे. आजही लोक मदत केंद्रावर थांबले असून त्यांना मदत करण्यासाठी लाखो हात पुढे सरसावले आहेत. राज्यतून आणि राज्या बाहेरून देखील सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा ओघ येतो आहे. येणाऱ्या मदतीमुळे समाजात माणुसकीचे दर्शन होते आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरस्थितीमुळे आपला रशिया दौरा रद्द केला आहे. देशातील काही निवडक मुख्यमंत्री एकत्रित रशियाच्या दौऱ्यावर जाणार होते. या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीसांची निवड केली होती. मात्र पूरस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्यास नजाणेच उचित समजले आहे.

Leave a Comment