पूर्वी ‘प्रदेशाध्यक्ष’ असलेल्या चित्रा वाघ यांची भाजप प्रदेश ‘उपाध्यक्ष’ पदी निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष असलेल्या चित्रा वाघ यांची आज भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नेमणूक केली. महिलांसाठी केलेले कार्य, राज्यभर असलेला संपर्क यामुळे आगामी विधानसभा निवडणुकी बघता भाजप कडून त्यांच्या दीर्घ अनुभव लक्षात घेता सदर निवड करण्यात आली आहे.

“आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. माझी प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाली. मी मुख्यमंत्री, चंद्रकांतदादा पाटील व सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानते व मी ग्वाही देते की मला दिलेली जबाबदारी योग्यपणे पार पाडेल.” सदर निवडी बद्दल चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या महिन्यात चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपा मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्यावर आज प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Leave a Comment