काँग्रेस-राष्ट्रवादीचे बोटावर मोजण्याएवढे आमदार येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |  विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असताना आरोप प्रत्यारोपपचे राजकारण चांगलेच रंगात आले आहे. अशातच भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर चांगलीच सडकून टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर समजेल की राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे बोटावर मोजण्या एवढेच आमदार येणार आहेत असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.

आपल्या जवळीची माणसे आपल्याला सोडून का गेली याचे आत्मपरीक्षण करायचे सोडून ते आमच्यावर आरोप करत आहेत असा टोला गिरीश महाजन यांनी शरद पवार यांचे नाव नघेता लगावला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये येण्यासाठी रांग लावली आहे मात्र त्यांना घ्यायचे की नाकारायचे हा आमच्या समोर प्रश्न पडला आहे असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.
येत्या काही दिवसात समजेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे किती मतब्बर नेते भाजप मध्ये येणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या धोरणाला कंटाळून नेते पक्ष सोडत आहेत हे त्यांच्या नेतृत्वाचे अपयश आहे हे ते मान्य कसे करणार असे देखील  गिरीश महाजन म्हणाले आहेत.

Leave a Comment