लातूर भूकंपानंतर आम्ही जशी मदत केली तशी मदत हे सरकार पूरग्रस्तांना करणार का : शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | अतिवृष्टी आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक गावे पाण्याखाली गेलीत. येथील लोकांची मोठी हानी झाली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने त्यांना आर्थिक मदत पुरवावी असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीकडून पुरग्रस्तांना जीवनावश्क वस्तुंचा पुरवठा करण्यात येत आहे. पुरामुळे वित्तहानी आणि भरून न निघणारी जीवीतहानी देखील झाली आहे. सरकार आणि सर्वच स्तरातून पुरग्रस्तांना मदत पोहचवली जात आहे. शरद पवार यांनीही सरकारकडे अधिकच्या मदतीचे आवाहन केले आहे. यावेळी शरद पवार यांनी लातूरच्या भुकपावेळचे उदाहरण दिले. ते म्हणाले, आमच्या काळात लातूरमध्ये जेव्हा भूकंप आला होता. तेव्हा अनेक घरे पडली होती. त्याठिकाणी आमच्या सरकारने तेथील कुटुंबीयांना आठ महिन्यांत एक लाख घरे बांधून दिली होती. या सरकारला ते शक्य आहे का? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.

शरद पवार यांची शनिवारी (१०ऑगस्ट) दुपारी बारा वाजता कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान पुर ओसरल्यानंतर लोकांना पुन्हा आपले बस्तान बसवण्यासाठी मोठे आव्हान असते तेव्हा सरकारची योग्य मदत त्यांना मिळणे गरजेचे असल्याचे शरद पवार यांनी म्हणले आहे.

Leave a Comment