भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना मिळणार वीर चक्र सन्मान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |  भारतीय हवाई दलाचे विग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल वीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बालाकोट येथे भारताने घडवलेल्या एअर स्ट्राईक मध्ये दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल अभिनंदन यांना हे वीर चक्र पदक दिले जाण्याची शक्यता आहे.

बालाकोट येथे जैश-ए-महम्मदच्या लष्करी तळावर भारताच्या हवाई दलाने एअर स्ट्राईक घडवला. या कारवाहीने चौताळलेल्या पाकिस्तानने मिग-२१ बायसन विमानाने भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय लष्कराने तो हल्ला परतवून लावला. पाकिस्तानी विमानांना पुरवून लावताना अभिनंदन यांचे विमान पाक व्यप्त काश्मीर मध्ये जाऊन कोसळले तेथे त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले.

पाकिस्तानात अभिनंदन यांच्यावर खूप अत्याचार करण्यात आले. त्यांना भारताची गोफणीय माहिती काढून घेण्यासाठी अत्याचार केले गेले. मात्र अभिनंदन यांनी कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिला. आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तनाच्या पंतप्रधानांनी अभिनंदन यांची आम्ही सुटका करत आहे असे पाकिस्तानच्या संसदेत सांगितले. त्यानंतर अभिनंदन यांना पाकिस्तानने वाघा बॉर्डर वरून भारताच्या स्वाधीन केले. अभिनंदन यांच्या पूर्ण शौर्य कहाणीला लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना वीर चक्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment