“ते मला विचित्र पद्धतीनं आलिंगन द्यायचे, माझ्या केसांचा सुगंध आवडतो असं म्हणायचे”, अभिनेत्री कंगनाचा दिग्दर्शक बहलवर गैरवर्तनाचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | ‘क्वीन’ चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर एका तरूणीने छेडछाडीचा आरोप लावला आहे. या वादात अभिनेत्री कंगना राणौतनेही उडी घेतली आहे. कंगनाने पीडित महिलेला पाठिंबा दर्शवत बहलने आपल्यासोबतही असभ्य वर्तन केल्याचे म्हटले आहे. “विकास बहल मला विचित्र पद्धतीनं आलिंगन द्यायचे आणि माझ्या केसांचा सुगंध आवडतो असं सांगायचे” असे अभिनेत्री कंगना रानौत ने बहल यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप करतेवेळी म्हटले आहे.

विकास बहलवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत बोलताना कंगनानं म्हटले की, ‘त्या महिलेने केलेल्या आरोपात तथ्य आहे. आणि त्यावर मी पूर्णतः विश्वास ठेऊ शकते. २०१४ मध्ये ‘क्वीन’ सिनेमाचं शूटिंग करत होते, त्यावेळी विकास विवाहित होते. आपल्या जोडीदारासोबतच्या शारीरिक संबंधांबाबतच्या गोष्टी ते बऱ्याचदा माझ्यासोबत शेअर करायचे. मी त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर कोणतेही विधान, मत व्यक्त करत नाही, पण आपण अनुभवू शकतो की हे सर्व त्यांच्यासाठी एक व्यसन झाले आहे.’ ‘जेव्हा कधीही विकास मला भेटायचे तेव्हा विचित्र पद्धतीनं आलिंगन द्यायचे, माझ्या केसांचा सुगंध आवडतो, असे सांगायचे. त्यांच्या हालचालींवरुन त्यांच्या वागण्यात काहीतरी चुकीचे आहे, असे नेहमी वाटायचे, अशी आपबिती कंगनाने सांगितली.

दरम्यान, कंगनाने केलेल्या आरोपांवर आता विकास बहल काय प्रतिक्रिया देणार हे पहावे लागणार आहे. तनुश्री दत्ता ने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपानंतर बाॅलिवुड मधील वातावरण चांगलेच तापले असताना कंगणाच्या विकास बहल यांच्यावरील आरोपाने #MeToo चळवळीमफदे आणखी भर पडली आहे.

Leave a Comment