युती बाबत फडणवीसांना मोदींनी दिल्या या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |  शिवसेना भाजप युती होणार की नाही या बाबत उलट सुलट चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांना ज्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे भाजप शिवसेनेचे ताणलेले संबंध चर्चेत आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युती करा तडजोड नाही अशा शब्दात सुनावले आहे. त्यामुळे येत्या काळात युतीचे काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भाजपमध्ये अनेक नेत्यांची झालेली आयात पाहता येत्या निवडणुकीला भाजप आणि शिवसेना युती होईल या बद्दल शक्यता कमीच आहे. सेना भाजप युती होईल म्हणून शिवसेनेत गेलेल्या लोकांची मात्र युती झाली नाही तर चांगलीच गोची होईल हे मात्र नक्की.

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात जनाशीर्वाद यात्रा काढून शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे केले आहे.तर कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुख्यमंत्री पद द्यायचेच नाही अशा पवित्र्यात भाजप नेते आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर आपणच पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात समोर येणार अशा घोषणा करत आहेत. त्यामुळे नेमके युतीचे तिढे कसे सुटणार हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.

Leave a Comment