मंत्री मंडळ विस्तारात ‘या’ मंत्र्यांची मंत्रीपदे जाणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राज्य मंत्री मंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. या विस्तारात बऱ्याच नेत्यांना घरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. प्रकाश मेहता राजकुमार बोडोले यांची कॅबेनेट मंत्री पदे जाणार असून प्रवीण पोटे, दिलीप कांबळे यांना हि आपले मंत्रिपद सोडावे लागू शकते. त्यामुळे मंत्री विस्तार म्हणजे कही ख़ुशी कही गम असेच असू शकते.

मुंबईच्या मलबार हिल येथील राज भवनच्या गार्डनवर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या ठिकाणी सर्व तयारी झाली असून काही क्षणातच या ठिकाणी राजकारणी मंडळीची वर्दळ पाहण्यास मिळणार आहे. ३०० लोकांच्या क्षमतेचा मंडप या ठिकाणी उभारण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह भाजपचे प्रमुख नेते या शपथ विधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील (भाजप), डॉ. संजय कुटे (भाजप), सुरेश खाडे (भाजप), योगेश सागर (भाजप), डॉ.अनिल बोंडे (भाजप), अतुल सावे (भाजप), आशिष शेलार (भाजप), परिणय फुके (भाजप), बाळा भेगडे (भाजप), जयदत्त क्षीरसागर (शिवसेना), तानाजी सावंत (शिवसेना), अविनाश महातेकर (रिपाइं) या नेत्यांची नावे मंत्री मंडळ विस्तारात पक्की मानली जात आहेत.

Leave a Comment