बार्शीत कोणाची होणार सरशी ; सोपल , राऊत लागले आमदारकीच्या कामाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बार्शी प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर महत्वाचा असणारा विधानसभा मतदारसंघ आणि मराठवाड्याचे प्रवेश द्वार म्हणून प्रसिद्ध असणारे शहर म्हणजे बार्शी. या शहरात बाजारपेठेचा झालेला विकास , शिक्षणाचे वाढलेले जाळे आणि विकसित झालेल्या सरकारी आणि वैद्यकीय सुविधा यामुळे शहरातचा पंचकृषीत चांगलाच लौकिक आहे. याच बार्शी मतदारसंघात दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत असा सामना रंगतो.

दिलीप सोपल यांनी १९८५ साली पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांनी ४ वेळा ४ वेगवेगळ्या चिन्हांवरून निवडणूक जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित केला. आता दिलीप सोपल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर शिवसेनेच्या तिकिटावर २००४ साली दिलीप सोपल यांना पराभूत केलेले राजेंद्र राऊत काँग्रेस मधून शिवसेनेत आणि शिवसेनेतून आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. या खेपेला राजेंद्र राऊत यांचे पारडे जड वाटत असले तरी ऐन वेळी दिलीप सोपल काय चमत्कार करणार यावर विजयाची बरीच गणिते अवलंबून आहेत. कारण २०१४ साली विधानसभेसाठी शिवसेनेचे उमेदवार असणारे राजेंद्र राऊत यांचा विजय होणार असे वाटत असताना राजेंद्र राऊत यांना मागे टाकत दिलीप सोपल यांनी विजयी छलांग मारली. त्यामुळे या मतदारसंघात नेमके काय होणार या बद्दल भलेभले अंदाज लावण्याला कचरत आहेत.

दिलीप सोपल यांनी जनतेशी तोडलेली नाळ आणि कधीही न ठेवलेला संपर्क हा त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. तर नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत दबदबा पाळून असलेले राजेंद्र राऊत दिलीप सोपल यांचा पराभव करण्यासाठी आसुसलेले आहेत. दिलीप सोपल यांच्यावर बार्शी बाजार समितीच्या सभापती असण्याच्या काळात लागलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि दिलीप सोपल यांनी जनतेशी नठेवलेला संपर्क हे निवडणुकीचे मुद्दे ठरू शकतात. तर सरकारच्या धोरणावर टीका करून जनतेची मते मिळवण्याचा कार्यक्रम दिलीप सोपल यांच्याकडून राभवला जाऊ शकतो. त्यामुळे बार्शीची विधानसभा चांगलीच चुरशीची होणार यात काही दुमत नाही.

Leave a Comment