अशी बनवतात चिकन स्क्रीप्सी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खाऊगल्ली | मांसाहारी लोकांमध्ये चिकनचे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. तसेच चायनीज पदार्थाला देखील आता मोठी पसंती मिळताना दिसते आहे. चिकन स्क्रीप्सी हा त्यातील एक प्रकार आहे. बनवण्यास अत्यंत सोपी असणारी रेसिपी म्हणून हि रेसेपी गृहिणीच्या देखील पसंतीला उतरलेली आहे. म्हणूनच आम्ही आमच्या वाचकांसाठी हि रेसिपी आज घेवून आलो आहे.

चिकन स्क्रीप्सी बनवण्याचे साहित्य
अर्धा किलो बोनलेस चिकन
कश्मीरी लाल तिकीट – अर्धा वाटी
आलंलसून पेस्ट – १ चमचा
कॉर्न फ्लॉवर – २ चमचे
मैदा – एक वाटी
तळण्यासाठी तेल

कृती | मोठ्या भांड्यात चिकनचे तुकडे टाका. त्यात अर्धा वाटी कश्मीरी टिखट टाकावे. कश्मीरी लाल तिखट हे कमी तिखट असते. मात्र त्याचा रंग चिकन स्क्रीप्सीला खूप चांगला चढतो म्हणून हे तिखट तुम्ही या रेसीपीसाठी वापावे. त्याच बरोबर १ चमचा आल लसून पेस्ट आणि चवीनुसार मिठ घालून मिश्रण एक जीव करून घ्यावे.एक जीव केलेले मिश्रण अर्धा तास झाकून ठेवावे जेणेकरून आपल्या चिकन स्क्रीप्सीला चांगला रंग चढेल.

अर्धा तास झाकून ठेवलेले मिश्रण उघडून त्यात २ चमचे कॉर्न फ्लॉवर घालावे. स्क्रीप्सीपणा येण्यासाठी त्यात एक वाटी मैदा यात मिक्स करावा. थोडे पाणी घालून मिश्रण ओलसर बनवा. त्यानंतर एका कढईत तेल तापायला ठेवून त्यात चिकनचे हे तुकडे तळून घ्या. चिकनचे हे तुकडे मंद आचेवर तळणे अत्यंत आवश्यक आहे कारण मोठ्या आचेवर हे तिकडे तळले तर आतून चिकन कच्चे राहण्याची शक्यता असते. चिकनचे हे तुकडे तळून झाल्यानंतर आपली चिकन स्क्रीप्सी तयार झाली.

Leave a Comment