“…अशा कितीही चौकश्या करा, माझं तोंड बंद होणार नाही” – राज ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । “मी त्यांना एकच गोष्ट सांगून आलोय ह्या अशा कितीही चौकश्या केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही” ईडी चौकशीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांची काल ही प्रतिक्रिया दिली.

अंमलबजावनी संचनालय (ईडी) ने सुमारे ८ तास त्यांची चौकशी केली. ‘कोहिनूर सीटीएनएल’ प्रकरणी त्यांना ईडीने समन्स बजवला होता. त्यासंधर्भात ते काल ईडीला सामोरे गेले होते. त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका अशा शब्दात मांडली.

गेल्या चार वर्षांपासून राज ‘मोदी-शहा जोडी हटाव’ चा नारा देत आहेत. यासाठी त्यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या पक्षाचे उमेदवार उभे न करता फक्त मोदी सरकारच्या विरोधात प्रचार केला. “मोदी आणि शहा ही दोन माणसं मला भारताच्या राजकीय पटलावर दिसता कामा नये” अशी भूमिका त्यांनी ह्या लोकसभेत जाहिरपणे मांडली होती. त्याचमुळे सत्तारूढ सरकार अशा चौकशींच्या माध्यमातून त्यांना अटकाव करण्याचा प्रयन्त करीत आहे, मात्र राज यांनी आपण शांत बसणार नाही असे यावेळी ठामपणे सांगितले.

Leave a Comment