मनसेला आघाडीत घेण्याबाबत जयंत पाटील केले ‘हे’ वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आज संयुक्त बैठक पार पडली आहे. जयंत पाटील यांनी मनसेला आघाडीत घेण्याबद्दल महत्वाचे वक्तव्य केले आहे. मनसेला आघाडीत घेण्याबद्दल आज काहीच निर्णय झाला नाही असे जयंत पाटील म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने मनसेला पुन्हा थांबा आणि वाट बघा असा आदेश दिला आहे असेच म्हणणे उचित ठरणार आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मागील काही दिवसापूर्वी सोनिया गांधी यांना जाऊन भेटले होते. त्यांच्या भेटीत बातचीत नेमकी काय झाली हे मात्र अद्याप देखील गुलदस्त्यात आहे. तरी देखील राज ठाकरे यांना आघाडीत सामावून घेण्याचा निर्णय होऊ शकतो अशी शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. आज झालेल्या आघाडी बैठकीत अन्य घटक पक्षांना कोणत्या आणि किती जागा द्यायच्या यावर विचार विमर्श करण्यात आला.

ज्या जागा जिंकल्या जातील त्याच जागी छोट्या घटक पक्षांना उमेदवारी दिली जाणार आहे असे जयंत पाटील यांनी म्हणले आहे. तसेच लवकरात लवकर जागा वाटपाचा निर्णय घेऊन आम्ही विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागणार आहे असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

Leave a Comment