२७ जुलै रोजी छगन भुजबळांचा शिवसेनेत प्रवेश!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेत २७ जुलै शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत अशी सोशल मीडियामध्ये चर्चा आहे. त्यांच्या या चर्चेने राष्ट्रवादीच्या नेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तर छगन भुजबळ यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

माझा जुना भायखळा हा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून मी निवडून आलो आहे. आज शिवसेनेत गेलेले सचिन अहिर यांचा मतदारसंघ आणि माझ्या भायखळा मतदारसंघ जवळ जवळ असल्याने अशा चर्चा सोशल मीडियात व्हायरल घडू लागल्या आहेत. माझी राष्ट्रवादी सोडण्याची कसलीच योजना नाही. त्यामुळे मी राष्ट्रवादी सोडणार आहे असा गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे.
छगन भुजबळ हे पुर्वाश्रमाचे शिवसैनिक आहेत. मुंबईचे महापौर पद त्यांनी शिवसेनेकडून जिंकले होते. त्याच प्रमाणे ते मुंबईमधून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार देखील निवडून आले होते. १९९५साली काँग्रेसमध्ये गेलेल्या छगन भुजबळ यांना शिवसेनेच्या बाळा नांदगावकर यांच्या यांनी पराभूत केले होते. छगन भुजबळ यांनी शिवसेनेकडून पराभव स्वीकारल्या नंतर मुंबई मधून निवडणूक लढण्याचा नाद कधीच केला नाही. त्यांनी नाशिक मधील येवला मतदारसंघातून आजवर निवडणूक लढली आहे.

Leave a Comment