वाद चिघळला ; अजित पवारांच्या त्या वक्तव्यावरून भाजप कार्यकर्ते संतप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी |  राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या प्रारंभी अजित पवार यांनी भाषण करताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा नाच्या असा उल्लेख केला. त्या निषेदार्थ आज नाशिकमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर निषेदाचे फलक झळकावण्यात आले आहेत. भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी हे फलक लावल्याने नाशिकचे वातावरण राजकीय दृष्ट्या तापले असल्याचे चित्र आहे.

अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी काल भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाशिक मध्ये अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन देखील केले आहे. सोमवारी कलम ३७० रद्द करण्यासाठी राज्यसभेत आणलेल्या विधेयकाच्या आनंद उत्सवात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नृत्य केले. त्याचा धागा पकडून अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर या वादाला तोंड फुटले आहे.

तिकडे नाशिक मध्ये पूर आला आहे आणि मंत्री नाचण्यात दंग आहे. नाच्याने नाचकाम सोडून जरा जनतेच्या समस्येकडे बघावे असे अजित पवार म्हणाले होते. तर गिरीश महाजन यांनी आपण मागील तीन दिवस नाशिकच्या पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच स्वतः येथील पुरग्रस्तांना मदत पोचवण्यास मदत करत आहे. त्यामुळे अजित पवारांना नेमके काय झाले आहे मला माहित नाही. परंतु त्यांच्या सारखे धरणात काही करण्याचे विचित्र वक्तव्य आम्ही देत नाही असे उत्तर गिरीश महाजन यांनी अजित पवार यांच्या विधानावर दिले होते.

Leave a Comment