चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा ; भाजपमध्ये करणार प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. चित्रा वाघदेखील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. येत्या ३० तारखेला चित्रा वाघ भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.शुक्रवारी रात्री त्यांनी आपल्या राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगलेच भाजपवासी करण्याकडे भाजपच्या नेत्यांनी चांगलीच रणनीती आखली आहे. निवडणुकीच्या आधी नेते फोडून भाजपमध्ये घ्यायचे आणि निवडणुकी आधीच नेत्यांना गर्भ गळीत करायचे असा मनसुबा भाजपच्या नेत्यांनी आखला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी चांगलीच गांगरली आहे असेच चित्र सध्या बघायला मिळते आहे.

येत्या ३० जुलै रोजी चित्रा वाघ, मधुकर पिचड आणि आमदार वैभव पिचड भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याचाच एक परिपाक म्हणून भाजपच्या नेत्यांनी त्यांना प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला लावला आहे का असा सवाल विचारला जातो आहे. हिरहिरीच्या महिला कार्यकर्त्या म्हणून चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी मध्ये लौकिक मिळवला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला संघटनात स्वतःला झोकून दिल्याने राष्ट्रवादीने त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन गौरव केला. मात्र चित्रा वाघ यांना राष्ट्रवादीत भवितव्य दिसून आले नसल्यानेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असे त्यांच्या काही सहकाऱ्यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड

दिलीप सोपलच भाजपमध्ये जाणार ; राजेंद्र राऊतांचे काय होणार?

वराती मागून घोडे ; कुमार स्वामी देणार भाजपला पाठिंबा

बागलांचा जीव भांड्यात ; संजय शिंदे करमाळा विधानसभेसाठी इच्छुक नाहीत

Leave a Comment