महाजनदेश यात्रा नव्हे हितर महाधनादेश यात्रा आहे : धनंजय मुंडे

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

जुन्नर प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला आज शिवनेरी किल्ल्यावरून प्रारंभ झाला. यात्रेच्या शुभारंभासाठी शिवनेरीवर आलेल्या धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. भाजपने महाजनादेश यात्रा काढली आहे मात्र हि महाधनादेश यात्रा आहे. तर आज शिवसेनेला जनतेच्या आशीर्वादाची आवश्यकता वाटली आहे अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी सरकारी पक्षांवर तोफ डागली आहे.

भाजपमध्ये आज नव्या लोकांना घेतले जात आहे. भाजपने तरुणांना दिलेली मेघा भरतीचे दिलेले आश्वासन पाळले नाही मात्र आज लोकांना आपल्या पक्षात घेऊन भाजप महाभरती करत आहे असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. भाजपमध्ये देखील भष्टाचार खदखदतो आहे. भूमिपूजन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची एक वीट देखील अदयाप या सरकारने रचली नाही त्यामुळे जनता शिवरायांचा अपमान करणाऱ्या या सरकारला गाढल्या शिवाय राहणार नाही असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

तर अमोल कोल्हे यांनी येणारे सरकार हे काँग्रेस आघाडीचे सरकार असणार आहे. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री कधीच शिवनेरीवर येत नाहीत. मात्र आमचा मुख्यमंत्री शिवनेरीवर येईल असे म्हणून सत्ता स्थापनेचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com