पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले? अमित शहांच्या सवालाला रोहित पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी आलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी शरद पवार यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले हे सांगा असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोलापूरच्या सभेत केला होता. त्याच सवालाचे उत्तर देण्यासाठी शरद पवार यांचे नातू रोहित पवार पुढे सरसावले आहेत. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अमित शहा यांना उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीच्या या डावपेचाने उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह

गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येवून साहेबांच कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं साहेबांनी काय केलं? अशा शब्दाचं रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच प्रमाणे त्यांनी भाजपच्या नेत्यांना डबल ढोल असे संबोधित केले आहे.

सामान्य माणूस शरद पवारांच्या सोबत आहे तर घरात आमदारकी पासून खासदारकी आलेले नेतेमंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पिठ बदलण्याची भाषा आपण केली होती, जाड भरडं पीठ पण दूसऱ्या पक्षात गेलं. आत्ता जमिनच नांगरायची वेळ आलेय. चांगली मशागत करुन ठेवुया अशा सांकेतिक भाषेत रोहित पवार यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर टीका केली आहे.

Leave a Comment