सुषमा स्वराज अनंतात विलीन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |  भाजपा नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आज लोदी रोड येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. काल मंगळवारी रात्री १०. ५० वाजता त्यांचे निधन झाले होते. हृदयविकाराचा झटका आल्या नंतर सुषमा स्वराज यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज आणि त्यांचे पती स्वराज कौशल यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांच्या अंत्यविधीला अनेक देशांचे राजदूत आणि भारतातील सर्वच पक्षाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्र्पती व्यंकय्या नायडू, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, अमित शहा, राजनाथ सिंह, गुलाम नबी आझाद, रामदास आठवले आदी नेते उपस्थित होते.

दरम्यान सुषमा स्वराज यांच्यावर विद्युत दाहिनीद्वारे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्याआधी त्यांना दिल्ली पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली त्यानंतर त्यांचे पार्थिव विद्युत दाहिनीत सरकवण्यात आले. त्यावेळी त्यांच्या पती आणि कन्येला आश्रू अनावर झाले होते.

Leave a Comment