पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निसर्गावर खूप प्रेम आहे ; बेअर ग्रिल्सने दिली प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पर्यावरणावर प्रचंड प्रेम आहे. त्यांना निसर्ग अगदी मनापासून आवडतो याचा अनुभव त्यांच्यासोबत केलेल्या कार्यक्रमात मला घेता आला असं मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बेअर ग्रिल्सने म्हटलं आहे.

डिस्कव्हरी चॅनेलवर प्रसारित होणा-या मॅन व्हर्सेस वाईल्ड या कार्यक्रमात राजकारणातील सर्वाधिक व्यग्र असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेगळे पाहायला मिळणार आहे. डिस्कव्हरी वाहिनीवर आज ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या कार्यक्रमात ते प्राणी संवर्धन आणि निसर्गातील बदलांवर आपले विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमाचा सुत्रसंचालक प्रसिद्ध स्काउट आणि साहसवीर बेअर ग्रिल्सही मोदींसोबत दिसणार आहे.

 

 

बेअर ग्रिल्स ने कार्यक्रमादरम्यान आलेले पंतप्रधान मोदींसोबतचे अनुभव सांगीतले आहे. ग्रिल्स म्हणतात, पंतप्रधान मोदींचे पर्यावरणावरचे प्रेम आणि निसर्गाप्रतिची ओढ पाहूनच मी त्यांच्यासोबत हा कार्यक्रम केला. त्यांनी त्यांच्या आयुष्यातला बराच काळ जंगल भागामध्ये घालवला आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा सोबत होतो तेव्हा आम्हाला फारशा अडचणी आल्या नाहीत असंही ग्रिल्स म्हणाले.

तसेच एवढ्या घनदाट जंगलात कार्यक्रम शूट करताना आम्ही घाबरलो नाही तर उलट मोदींच्या सहवासाने आम्हाला अधिक धीर मिळत गेला. कार्क्रमाच्या शूटींग दरम्यान, टीम अनेकदा घाबरायची पुढे काय होणार याची धास्ती टीम ला असायची मात्र, त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी पहायचो, ते अत्यंत शांत असायचे. त्यांना मी पूर्ण प्रवासात अगदी शांतपणे वावरताना पाहिलं. त्यांना असं पाहण्याचा अनुभवही शिकवून गेला असेही बेअर ग्रिल्सने म्हटलं आहे.

Leave a Comment