३७० च्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी मोदीसरकार बद्दल दिली हि प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी  |  केंद्र सरकारवर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सतत आग ओखणाऱ्या राज ठाकरे यांनी ३७० च्या मुद्दयांवर केंद्र सरकारची स्तुती केली आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा संदर्भात भाष्य केले असून त्यांनी अवघ्या एका ओळीचे ट्विट करून सरकारच्या या निर्णयाची प्रसंशा केली आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या स्तुतीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप ( पहा व्हिडीओ )

केंद्र सरकारने केल्यानंतर आज संध्याकाळी जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. तत्पूर्वी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार कलम 370 हटवण्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विटरवरून एका ओळीची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यात ते म्हणतात की, ”गेल्या काही काळातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय !”

राज्यसभेत आज चर्चा करण्यात आली. त्यानंतर विरोधकांनी मतविभागणीची मागणी केल्याने झालेल्या मतदानामध्ये हा प्रस्ताव 125 विरुद्ध 61 मतांनी पारित करण्यात आला. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला 370 कलम रद्द करत विभाजन करण्याचा प्रस्ताव आज राज्यसभेत मांडला होता.

Leave a Comment