सुभाष देशमुखांच्या लोकमंगलमुळे विधान परिषद तहकूब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | सहकार, मदत आणि पुनर्वसन मंत्री  सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीमधील गैरव्यवहारप्रकरणी  राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी क्लीन चीट दिली आहे. महत्तावाचं म्हणजे  लोकमंगल सोसायटीच्या गैरव्यवहारा बाबत पोलीस फिर्याद दाखल असून चौकशी सुरु असतानाच राज्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली असल्याचे विधान परिषदेत स्पष्टीकरण दिले.

लोकमंगल सोसायटीने कोणताही गैरव्यवहार केला नाही,उलट सरकारकडून घेतलेले अनुदान परत देण्याचा ठराव पास करुन त्यांनी व्याजासकट पैसे परत केले असल्याचं गजब उत्तर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज विधान परिषदेत दिले.

राष्ट्रवादीचे विरोध पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी आक्षेप घेतला आहे. चोर चोरी करत असताना अलार्म वाजला पण त्याचा चोरीचा हेतू होता असे म्हणत या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. विधान परिषद सभापतींनी याप्रकरणी माहिती घेऊ अस सांगितल्यामुळे विरोधक संतप्त झाले. विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर सभापतींनी विधान परिषद दहा मिनीटे तहकूब केली. लोकमंगल प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. तसेच लोकमंगलचा सल्लागार (consultant) फरार असून तो सापडत नसल्याची माहिती राज्यमंत्र्यांनी दिली आहे. असे असताना दुसरीकडे मंत्र्यांनीचं लोकमंगल मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीला गैरव्यवहारप्रकरणी क्लीन चीट दिली आहे.

Leave a Comment