ताज्या बातम्याबॉलिवुडमुंबई

म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-वडिलांचा फोटो

मुंबई प्रतिनिधी |  सनी लिओनी हि बॉलिवूडची बेबी डॉल म्हणून ओळखली जाते. सनीने आपल्या करियरची सुरुवात पॉर्न फिल्म बनवण्यापासून केली होती.. त्यानंतर तिने पॉर्न फिल्मच्या संदर्भातील अडल्ट इंडस्ट्रीसोडून बॉलीवूड मध्ये येण्याचा निर्णय घेतला. इथे आल्यावर तिच्याकडे लोकांनी अत्यंत विक्षिप्त नजरेने बघायला सुरुवात केली. मात्र काही झालं तरी आपण पुन्हा पॉर्न इंडस्ट्रीकडे जायचं नाही असा निर्धार तिने केला होता. म्हणून तिने इथंच काम शोधण्याचा प्रयत्न केला. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर इथे देखील आपले अढळ स्थान निर्माण केले. सनी आज आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये मोठ्या स्थानी आहे. तिच्या आयुष्यातील संघर्षांवरच तिने एक मुलाखत दिली. त्या मुलाखती मध्ये तिने आपण आपल्या आईवडिलांचे फोटो सुद्धा कधीच पाहत नाही असे म्हणले आहे.

Untitled design (11).jpg

सनी लिओनीच्या जीवनपटावर आधारित ‘करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ हि वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे. या वेब सिरीजमध्ये सनी लिओनीच्या आयुष्यात घडलेल्या चढउतारावर प्रकाश टाकण्यात आला आहे. सनी लिओनीने स्वतः या वेब सिरीजमध्ये काम केले आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून माझया आयुष्यातील सर्व सत्य लोकांसमोर आणले जावे अशी माझी अशा होती असे सनी एका मुलाखतीत म्हणाली आहे.

‘करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ या वेब सीरिजचे चित्रीकरण जेव्हा करण्यात आले तेव्हा सेट वर सनी लिओनीच्या आई वडिलांचे फोटो होते. ते फोटो बघून सनी लिओनीला खूप वाईट वाटत असे. त्यांचे फोटो बघून तिचे डोळे पाण्याने भरून येत असत म्हणून ती कधीच तिच्या आई वडिलांचा फोटो बघत नाही असे सनी लिओनीने म्हणले आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ताज्या बातम्या

1
2
3
4
5
6
7
8
x Close

Like Us On Facebook

shares