पाणी टंचाईने घेतला युवकाचा बळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | मुंबई पुण्यात पावसाने नागरिकांचे जीवन हैराण केले असले तरी महाराष्ट्रातील काही भागात अद्याप हि दुष्काळ हटलेला नाही. याचाच प्रत्येय अणूण देणारी दुर्दैवी घटना आज नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील मेशी गावी घडली आहे. या ठिकाणी पाणी टंचाई असल्याने पाण्याचे टँकर पुरवले जातात. पाण्यासाठी आलेला टँकर उलटल्याने सोपान चव्हाण या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

पाण्याने भरलेला टँकर पलटी होऊन त्याखाली दबून सोपानचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी देवळा तालुक्यातील मेशी इथे ही घटना घडली. गिरणा कालव्यातून पाणी भरून जात असताना एका वळणार ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. हि घटना एवढी अचानक घडली कि क्षणार्धातच होत्याचे नव्हते झाले असे येथील प्रत्यक्ष दर्शिनी व्यक्तींनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, देवळा भागात अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे या भागातील अनेक गावांना आजही भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणी टंचाईने या तरुणाचा बळी घेतल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment