नारायण राणेंना देखील जायचय भाजपमध्ये ; त्यांच्याबद्दल मुख्यमंत्री पाच दिवसात निर्णय घेणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | नारायण राणे यांना देखील भाजपमध्ये यायचे आहे. सध्या ते भाजपच्या कोठ्यातून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांना भाजपमध्ये सक्रिय व्हायचे आहे. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेचा विरोध आहे. मात्र आपण भाजपमध्ये जायचे की नाही यासंदर्भात येत्या १० दिवसात निर्णय घेणार आहे असे सांगितले आहे. ते एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

नारायण राणे यांना पक्षात घेण्याबाबत अमित शहा यांनी ग्रीन सिंग्नल दिला आहे. आता निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. येत्या चार ते पाच दिवसात मुख्यमंत्री त्या निर्णयाबद्दल कळवणार आहेत असे नारायण राणे म्हणाले आहेत. शिवसेना भाजप युती तुटल्यास नारायण राणे भाजपमध्ये दाखल होऊन निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जर युती अभेद्य राहिल्यास नारायण राणे आपल्या पक्षाचे बादली हे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची शक्यता आहे.

सध्या नेत्यांना बदनाम करणारी एक एजेन्सी राष्ट्रीय स्तरावर काम करत आहे. ती एजेन्सी नेमकी कोणत्या पक्षासोबत काम करत आहे की स्वतः पैसे कमवण्यासाठी काम करत आहे हे अद्याप समजले नाही. मात्र नेत्यांना बदनाम करण्याचे सर्व मार्ग त्या एजन्सीकडून वापरले जातात. त्यामुळे नेत्यांची प्रतिमा सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून बदनाम होते असे नारायण राणे या मुलाखतीत म्हणाले आहेत. हि एजेन्सी नेत्यांना बॅकमेल देखील करते छगन भुजबळ याच एजन्सीचे शिकार झाले आहेत असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

Leave a Comment