नवसाला पावलेल्या मारुतीला मोदींच्या चाहत्यांनी अर्पण केला सव्वा किलो सोन्याचा टोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाराणसी | नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेत यावे असा नवस अरविंद सिंग संकटमोचक मारुतीला केला होता. मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा भाजपाचे सरकार निवडून आले. अरविंद सिंग यांचा नवस पूर्ण झाला. म्हणून आज, मोदी यांच्या वाढदिवशी अरविंद यांनी मारुतीला सव्वा किलो सोन्याचा मुकुट अर्पण करून नवस फेडला.

सूरत येथेही आगळ्या रीतीने मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. कन्व्हेंशन सेन्टरमध्ये ७ हजार किलोचा केक कापण्यात येणार आहे. हा ७०० फूट लांब केक ७०० प्रामाणिक नागरिकांच्या हस्ते कापण्यात येईल. हा केक ब्रेडलाइनर बेकरीने तयार केला आहे. बेकरीचे मालक नितीन पटेल म्हणाले की हा जगातला सर्वात मोठा केक आहे. याची विश्वविक्रमात नोंद होईल.

दरम्यान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन सेवा दिन म्हणून साजरा केला जात आहे. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात दौरा करून  अनेक विकास कामाचे उद्घाटन केले. त्याच प्रमाणे त्यांनी त्यांच्या आईची देखील भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांनी आईच्या पायाला स्पर्श करून आर्शीवाद घेतला आहे. तसेच आईने वाढदिवसा निमित्त दिलेली भेट स्वीकारताना नरेंद्र मोदी यांना गहिवरून आले.

Leave a Comment