पाणी प्रश्नावर, भाजप आमदाराने शेतकऱ्याचा मोबाईल हिसकावला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी। विधानसभा निवडणूक जवळ आल्याने नेवासा मतदार संघाचे भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे आपल्या मतदारसंघाचा दौरा करत आहेत. मतदार संघातील गावांना भेटी देऊन त्यांनी निववडणूक पूर्व प्रचार सुरु केला आहे. दरम्यान या दौऱ्यात अनेक मतदार आमदारांना आपल्या समस्या सांगताना दिसत आहेत. मात्र मुरकुटेंचा दौरा सुकली गावात पोहचला असतांना स्वागतासाठी उभ्या असलेल्या गावातील नागरिकांनी आमचा पाण्याचा प्रश्न सोडवा अशी विनंती केली. त्यावर ‘सुटणार तुमचा पाणी प्रश्न सुटणार’ असे आश्वासन देत असतांना, एका शेतकऱ्याने आपल्या मोबाईल मध्ये व्हिडीओ शूटिंग सुरु केले होते. हे पाहून मुरकुटेंचा अचानक पारा चढला. कॅमेरात रेकॉर्डिंग सुरु असल्याचे लक्षात येताच त्यांनी शेतकऱ्याच्या हातातील मोबाईलच हिसकावून घेतला. हा सर्व प्रकार पाहता तेथील मतदार असलेल्या शेतकरी वर्गाला राजकीय नेत्याचा मुजोरपणा बघायला मिळाला.

अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागात असलेल्या नेवासा तालुक्यात बहुतांश भागात पाण्याचा सुकाळ आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यातील ८० टक्के भागाला दुष्काळ म्हणजे काय हे विशेषतः माहितीच नसते. नेवासा तालुक्यातील काही भाग हा गेली अनेक वर्षे पाण्यापासून वंचित राहिलेला आहे. काही अंतरावरून गोदावरी नदी वाहते तर तालुक्याच्या वरच्या बाजूला मुळा धरण असून देखील अनेक गावे तहानलेलीच आहेत. हाच प्रश्न सोडवण्यासाठी तालुक्यातील जनतेने पूर्वापार निवडून येणाऱ्या नैतृत्वाला मतदान न करता फाटा देत भाजपचे नवीन उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांना निवडून दिले होते. मात्र कालच्या घडलेल्या प्रकाराने विद्यमान आमदार या पाणी प्रश्नाबाबत किती गंभीर आहेत यावरच प्रश्नचिन्ह आहे.

Leave a Comment