राधिकाचा ब्लेंडर्स प्राइड मॅजिकल नाइट मधे जलवा

0 0

पुणे | ब्लेंडर्स प्राइड मॅजिकल नाइट्स या फॅशन सोहळ्याच्या निमित्ताने पुण्याचा आसमंत कधी नव्हे इतक्या दिमाखदार स्टाइलने झळाळून निघाला. या कार्यक्रमात अरुणजाकृत स्वरमेळाच्या अनवट ठेक्यावर गौरी आणि नयनिका यांच्या विविधरंगी स्टायलिश डिझाइन्स प्रेक्षकांसमोर सादर झाल्या. या प्रसंगी गौरी आणि नयनिका यांचे डिझाइन परिधान केलेल्या राधिका आपटे हिने आपल्या स्तिमित करणाऱ्या व्यक्तिमत्वाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

ही संध्याकाळ म्हणजे यशापयशाच्या पारंपरिक चौकटींच्या पार जात साजरा झालेला स्टाइलचा अस्सल आणि अनोखा सोहळा होता. स्वत:ची खास शैली तयार करणाऱ्या व या कामगिरीचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या व्यक्तींचं कौतुक हे या सोहळ्यामागचे कारण होते. स्टाइलच्या विश्वातील हेच ताणेबाणे नजाकतीने विणण्यासाठी ब्लेंडर्स प्राइड मॅजिकल नाइट पुण्यामध्ये अवतरली होती.

या कार्यक्रमाविषयी बोलताना परनॉड रिकार्ड इंडियाचे असिस्टंट व्हाइस प्रेसिडंट श्री. राजा बॅनर्जी म्हणाले, ”आजचा ग्राहकवर्ग खास स्वत:च्यासाठी बेतलेली स्टाइल बाळगण्याच्या आणि ती तितक्याच जाहीरपणे अभिव्यक्त करण्याच्या बाबतीत कोणतीही त़डजोड करत नाही. म्हणूनच स्टाइल ही गोष्ट लोकशाहीचा आत्मा जपणारी आहे. कारण स्टाइल म्हणजे स्वत:ची खास ओळख घडविण्याच्या व त्यातील अस्सलपणा जपण्याची धडपड करण्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेचे सादरीकरण आहे. ब्लेंडर्स प्राइड मॅजिकल नाइट्सने फॅशन, संगीत आणि बॉलिवूड या तिन्ही क्षेत्रांतील सर्वाधिक स्टायलिश गोष्टींचा विस्मयकारक मेळ साधत हेच तत्व मूर्त स्वरूपात सर्वांसमोर आणलं आहे. ग्राहकांना पूर्वी कधी न घेतलेला, भारावून टाकणारा अनुभव देण्याची परंपरा यानिमित्ताने आम्ही सुरू ठेवली आहे.”

आपल्या झळाळत्या करिश्म्यानिशी रॅम्पवर उतरलेल्या राधिका आपटेने अभिजात स्टाइल आणि दिमाखात प्रेक्षकांवर मोहिनी टाकली. अरुणजानेही समकालीन ठेका आणि हृदयस्पर्शी व्होकल्सने सजलेल्या जोषपूर्ण सादरीकरणाने सर्वांना भारावून टाकले.

या कार्यक्रमाविषयी बोलताना राधिका आपटे म्हणाली, ”रंगमंचापासून ते मी साकारलेल्या भूमिकांपर्यंत सर्वत्र मला मिळालेल्या अनुभवांनी माझी चाकोरीपेक्षा वेगळी आणि विमुक्त स्टाइल घडविण्यास मदत केली आहे. स्वत:ला पारंपरिक चौकटींच्या बाहेर नेण्याच्या माझ्या धडपडीचा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाशी संपूर्णपणे मेळ साधणारे काम केल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. म्हणूनच ब्लेंडर्स प्राइड मॅजिकल नाइट्स २०१८ चा भाग बनण्याचा व स्टाइलचा सोहळा साजरा करणाऱ्या या आयकॉनिक रॅम्पवर चालण्याचा अनुभव माझ्या आनंद आणि उत्साहात भर टाकणारा आहे.”

डिझायनरद्वयी गौरी आणि नयनिका म्हणाल्या, ”ब्लेंडर्स प्राइड मॅजिकल नाइट्स २०१८ साठी आम्ही तयार केलेले कलेक्शन रोमँटिसिझमची भावना जागी करणारे आहे. हे डिझाइन अधिक ताकदीचे, आपल्या बाह्याकारातून, रंग, पोत आणि झळाळीतून निश्चित असे भाष्य करणारे आहे. यात टूलमध्ये घडवलेल्या चंचल रफल्सच्या लाटा आहेत, मिडी ड्रेसेसमध्ये हलक्याफुलक्या सिल्क ऑरगंझाचा वापर आहे तर आपल्या बाह्यरेषेतून प्रवाही आकार घेणारे गाउन्स आहेत, भरतकाम केलेली प्रचंड आकाराची फुले, ट्रेलिंग बो आदींनी केलेली सजावट आहे. एकूण हे नजरेत भरणाऱ्या रंगांनी सजलेले कलेक्शन आजच्या दिमाखदार रात्रीशी संपूर्णपणे मेळ साधणारे आहे. ”

Leave a Reply

x Close

Like Us On Facebook