Breast Cancer | केवळ 1 मिनिटातच होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; स्मार्ट ब्रा अशाप्रकारे करणार काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Breast Cancer | आज काल कर्करोग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातही महिलांमध्ये खास करून स्तनांचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या बनलेली आहे. परंतु यावर आता एक तोडगा देखील निघताना दिसत आहे. आता आयआयटी कानपूरच्या एका संशोधकाने एक स्मार्ट ब्रा विकसित केलेली आहे. ज्यामुळे तुम्हाला स्तनाचा कॅन्सर झाला आहे की, नाही हे शोधणे अत्यंत सोपे होणार आहे.

ही स्मार्ट ब्रा संशोधक श्रेया नायर यांनी बायो सायन्स आणि बायो इंजीनियरिंग विभागाचे प्रमुख प्राध्यापक अमिताभ बंदोपाध्याय यांच्या देखरेखीखाली तयार केली आहे. आजकाल ब्रेस्ट कॅन्सरचे (Breast Cancer) प्रमाण झपाट्याने वाढू लागलेले आहेत. आणि अनेकदा ब्रेस्ट कॅन्सर झाला हे महिलांना समजत सुद्धा नाही. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे की, नाही याचे निदान होण्यासाठी आता ही एक नवीन ब्रा विकसित केलेली आहे.

स्मार्ट ब्रा खूप कसे काम करते? | Breast Cancer

ही स्मार्ट ब्रा खूपच आश्चर्यकारक आहे. यामध्ये एक प्रकारचा सेन्सर लावलेला आहे. ज्यामुळे तुमच्या स्तनांमध्ये कोणताही बदल झाला तरी, या ब्रामधील सेंसरला लगेच ते समजते. आणि स्तनांची कर्करोगाची लक्षणे असल्यास ती लगेच दिसतात. आणि सेन्सर ताबडतोब तुम्हाला अलर्ट पाठवतो. स्तनांचा कर्करोग हा एक असा कर्करोग आहे. ज्याच्या जर तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे समजली तरच उपचार होऊ शकतात. त्यामुळे ही ब्रा आता खूप फायदेशीर ठरणार आहे.

एक मिनिटात मिळणार माहिती

ही ब्रा तुम्हाला दिवसातून केवळ एक मिनिट घालायची आहे. ही ब्रा तुमच्या मोबाईलची कनेक्टेड असणार आहे. त्यामुळे तुमचा संपूर्ण डेटा तयार केला असेल, जर ब्रामध्ये असलेल्या सेंसरला तुमच्या स्तनांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल आढळला, तर तो बदल ते लगेच मोबाईलवर पाठवते. आणि महिलेला डॉक्टरची संपर्क साधण्याचा सल्ला देते. अशा प्रकारची एक सिस्टीम यामध्ये तयार केलेली आहे.

याबद्दल सांगताना श्रेया नायर यांनी सांगितले की, या ब्राची क्लीनिकल ट्रायल सुरू आहे. जर संपूर्ण सुरळीत झाले तर वर्षभरात ही ब्रा बाजारामध्ये देखील उपलब्ध होईल. या प्राची किंमत जवळपास पाच हजार रुपये एवढी असणार आहे. या आधी बाजारात असे कोणत्याही प्रकारचे उपकरण उपलब्ध नसल्याचा दावा देखील शास्त्रज्ञांनी केलेला आहे. परंतु आता ही ब्रा जर मार्केटमध्ये उपलब्ध झाली, तर स्तनांचा कर्करोग लवकर ओळखणे आणि त्यावरती लवकर उपचार करणे खूप सोपे होणार आहे.