Brinjal Cultivation | नुकताच उन्हाळा चालू झालेला आहे. आणि शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके लावायला सुरुवात देखील केलेली आहे. उन्हाळ्यामध्ये अनेक प्रकारची पिके लावली जातात. परंतु वांग्याचे पीक शेतकरी उन्हाळ्यात जास्त प्रमाणात घेतात. कारण वांगे हे एक समृद्ध असे पीक आहे. वांग्याचे उत्पादन करून तुम्हाला खूप चांगल्या नफा देखील करू शकतो. परंतु अनेकवेळा शेतकऱ्यांना वांग्याची लागवड (Brinjal Cultivation) करताना कोणत्या जातीची बियाणे निवडावी? त्याप्रमाणे लागवड कशी करावी? याची योग्य माहिती नसते. त्यामुळे त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. आजच्या या लेखांमध्ये आपण वांग्याच्या लागवडीबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
वांग्यांची जात
पुसा हायब्रीड 5, पुसा हायब्रीड 9, विजय हायब्रीड, पुसा पर्पल लवंग, पुसा क्लस्टर, पुसा क्रांती, पंजाब जामुनी गोला, नरेंद्र बागान 1, आझाद क्रांती, पंत ऋतुराज, पंतसम्राट, टी 3 या वांग्याच्या काही प्रसिद्ध जाती आहेत.
लागवड करण्यापूर्वी मातीत हे पदार्थ मिसळा | Brinjal Cultivation
वांग्यासाठी ज्या जमिनीत लागवड करणार आहात, ती जमीन चांगल्या निचऱ्याची असायला हवी. त्याचप्रमाणे शेणखत शेत तयार करताना लागवडीपूर्वी पोषक म्हणून वापरता येते. लागवडीपूर्वी स्फुरद, पालाश आणि नायट्रोजन जमिनीत मिसळावे.
बियाणे निवड
लागवड करताना चांगल्या प्रतीची बियाणे निवडा बियाणी योग्य तापमान आणि ऊर्जेच्या पातळीवर साठवा वनस्पती किती चांगली वाढेल. हे देखील उच्च दर्जाच्या बियाणांवर अवलंबून असते.
वांग्याची लागवड पद्धती
वांग्याची लागवड करताना योग्य अंतर निवडा चांगली लागवड करा. वांग्याचे दोन प्रकार आहेत. उंच जातीसाठी 70 ते 75 सेंटीमीटर आणि गोलाकार फळे कमी उत्पादन देणाऱ्या वानांसाठी 90 सेंटीमीटर च्या अंतरावर रोपे लावा. एका हेक्टरमध्ये पिकाची लागवड करण्यासाठी 250 ते 300 ग्रॅम इतके बियाणे आवश्यक आहे.
खते आणि जलश्रोत
वांग्याच्या पिकांसाठी खतांचा योग्य वापर करावा लागतो. वेळेवर पाणी देखील द्यावी लागते खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात वांग्याची लागवड केली जाते. उन्हाळ्यात 7 ते 8 दिवसाच्या अंतराने वांग्याला पाणी द्यावे. त्याचप्रमाणे हिवाळ्यात दहा ते बारा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
रोग आणि कीड व्यवस्थापन
वांग्याची झाडी निरोगी राहण्यासाठी रोग आणि किडीचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. नाहीतर झाडे खराब होतात. माशांपासून वांग्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. हे लहान पांढरे रंगाचे किडे असतात. जे पानांचा रस शोषतात.
यावेळी करा तोडणी
पिकाला चांगला भाव मिळण्यासाठी वांग्याची तोडणी पूर्ण करण्यापूर्वी तपासणी करावी लागते. तोडणी करण्यापूर्वी त्याचा रंग, आकार याकडे विशेष लक्ष द्या या सगळ्या गोष्टी जर योग्य असेल तरच त्याची तोडणी करा.