Brown rice vs White Rice | आरोग्यासाठी पांढरा भात चांगला की तपकिरी भात? जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Brown rice vs White Rice | प्रत्येक प्रदेशानुसार तेथील अन्नपदार्थ बदलत असतात. भात हा भारतीयांच्या आहारातील एक प्रमुख पदार्थ आहे. अनेक लोकांचे भाताशिवाय जेवण अपूर्ण होते. विशेषता दक्षिणात्य भारतामध्ये भात त्यांच्या जीवनाचा अविभाज्याचा भाग आहे. त्यांच्या जीवनात सकाळी संध्याकाळी आणि दुपारी भाताचा समावेश असतो. परंतु जेव्हा लोकांना वजन कमी करायचे असते. तेव्हा ते त्यांच्या आहारातून भात वगळतात. परंतु अनेक लोक असे देखील आहे. जे पांढरा भात खाण्याऐवजी तपकिरी भात खातात. (Brown rice vs White Rice)

तपकिरी तांदूळ हा पांढऱ्या तांदळापेक्षा खरंच फायदेशीर असतो का? यामुळे आपल्या शरीराला नेमका काय फायदा होतो? असे अनेक प्रश्न लोकांना पडत असतात. तर आज आपण आपल्या या लेखांमध्ये पांढरा तांदूळ आणि तपकिरी तांदूळ यांमध्ये काय फायदेशीर आहे? आपल्याला आरोग्याला कोणता तांदूळ योग्य आहे हे पाहणार आहोत.

फायबर समृद्ध

तपकिरी तांदूळ हा आहारातील फायबरचा सगळ्यात मोठा स्त्रोत आहे. हा तांदूळ खाल्ल्याने तुमची अन्नपचन सुधारते. त्याचप्रमाणे वजन देखील नियंत्रणात होते आणि बद्धकोष्ठतेचा समस्या असेल तर ती दूर होते.

कमी ग्लायसेमिक निर्देशांक | Brown rice vs White Rice

पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत तपकिरी रंगाच्या तांदळाच्या ग्लासमिक इंडेक्स कमी असतो. तो खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढत नाही. तुम्हाला जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण ठेवायची असेल, तुम्ही हा तपकिरी रंगाचा तांदूळ खाऊ शकता.

उच्च पोषक घटक

तपकिरी रंगाच्या तांदळामध्ये भुशी आणि वरचा थर असतो. ज्यामध्ये फायबर जीवनसत्व मॅग्नेशियम फॉस्फरस बी जीवनसत्वे यांसारखे अनेक पोषक्ततवे असतात. त्यामुळे पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत तो तुमच्यासाठी खूप पौष्टिक असतो.

हृदय आणि मनावर परिणाम

पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत तपकिरी रंगाच्या तांदळाचे फायबर, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून जळजळ देखील कमी करते. यामुळे तुमच्या हृदयाला देखील फायदा होतो.

वजन नियंत्रणात राहते

तपकिरी रंगाच्या तांदळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. आणि तुमची भूक नियंत्रणात आणते. त्यामुळे तुमचे वजन कमी करण्यासाठी देखील तपकिरी रंगाचा तांदूळ फायदेशीर आहे.