एकतर्फी प्रेमातून तरुणीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात नवरात्र उत्सव सुरू आहे. मात्र तरी देखील या काळात महिला अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. नुकतीच कोल्हापूर येथील हातकणंगले तालुक्यात एकतर्फी प्रेमातून 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत लैंगिक अत्याचार केल्यानंतर मुलीची गळा आवळून हत्या ही करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपी सनी अरुण कांबळेला अटक केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी सनी कांबळे गेल्या दीड वर्षांपासून संबंधित तरुणीला त्रास देत होता. ही तरुणी एका फूटवेअरच्या दुकानात कामाला होती. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे आई-वडील आणि मुलगी तिघेजण ही बाहेर काम करत होते. मात्र दुसऱ्या बाजुला आरोपी सनी तरुणीला त्रास देत होता. यामुळे तरुणीच्या कुटुंबाने सनीला समजावण्याचा देखील प्रयत्न होता. मात्र तरी देखील त्याने तरुणीला त्रास देणे थांबवले नाही. शेवटी, तरुणीशी चर्चा करायची असल्याचे सांगत सनीने तीला ओढ्याजवळील शेतात नेले. यावेळेसच सनीने तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. एवढेच करून न थांबता, सनीने तरुणीची गळा आवळून हत्या  केली. त्यानंतर तो तेथून फरार झाला.

इकडे तरुणी घरी आली नसल्यामुळे कुटुंबाची शोधाशोध सुरू झाली. शेवटी त्यांना तरुणी  शेतात मृत अवस्थेत सापडली. यानंतर कुटुंबाने ताबडतोब घडलेल्या घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेचा तपास करीत असताना पोलिसांना आरोपी सनी विरोधात पुरावे आढळून आले. अखेर त्यांनी याचं पुराव्यांच्या आणि मिळालेल्या माहितीच्या आधारावर सनीला अटक केली. दरम्यान, अटकेनंतर आरोपी सनीने आपला गुन्हा कबूल केला आहे. तसेच एकतर्फी प्रेमातून आपणच तिची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. सध्या या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.